आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
केळवणे : कोकण एज्युकेशन सोसायटी च्या को. ए. सो. हायस्कूल केळवणे या शाळेत 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्सहाने पारपडला . सर्वप्रथम सकाळी 8 वाजता ध्वजारोहन मा. श्री.वामन नामदेव माळी (शाळा जमीनदाते )(कै.चांगा बुध्या पाटील -जमीन दात्ते )यांच्या शुभ हस्ते फडकवण्यात आला.त्या नंतर शाळेतील
विध्यार्थिनींनी अतिशय सुंदर आवाजात राष्ट्रगीत, वंदेमातरम, राज्यगीत, समूहगीत यांचे गायन केले. त्यांच्या गायनाला शाळेतील शिक्षक श्री. निखिल मांडवकर सर यांनी तिशय सुंदर असा तबला वाजवला. सदर कार्यक्रमांस शाळा समिती चेअरमन मा. श्री.वि. ना.कोळी साहेब, शाळा समिती सदस्य. मा.श्री.डॉ. देविदास शिवकर साहेब, मा. श्री. विलास ठाकूर साहेब, मा. श्री.आशिष घरत साहेब. केळवणे सरपंच मा. श्री.गुरुराज ठाकूर, माजी जि. प. सदस्य श्री. ज्ञानेश्वर घरत उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. आदरणीय गौतम कांबळे सर यांनी प्रथमता पाहुण्यांचा परिचय दिला व सत्कार केला. त्या नंतर विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे झाली. गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम होऊन विध्यार्थ्यांना सोडण्यात आले. सदर या सोहळ्यास शाळेतील जेष्ठ शिक्षक, श्री. एम. स. पाटील सर, जेष्ठ शिक्षिका सौ. के. टी. ठाकूर मॅडम, सौ. बी. के. ठाकूर मॅडम, श्री. नवनीत कांबळे सर, श्री. अनमोल पगारे सर, श्री. देविदास गांगुर्डे सर, निखिल मांडवकर सर, आनंद मनवर सर, शिक्षकेतर कर्मचारी. श्री. संतोष पाटील, श्री. मधुकर पाटील. उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस ज्ञानदीप माजी विद्यार्थी संघटना पदाधिकारी, माजी विध्यार्थी गावातील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, राजकीय, सामाजिक पुढारि, महिला, गावकरी मोठ्या उत्साहात पाऊस जोराचा असुन उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नवनीत कांबळे सर यांनी केले.























