आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
सुधागड :- तालुक्यातील कोकण एज्युकेशन संस्थेच्या डॉ. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी विद्यालय परळी येथे मानव विकास अंतर्गत सायकल वितरीत करण्यात आल्या. या कार्यक्रमा प्रसंगी शाळा समिती सभापती मा. ऍड. प्रवीण भाई कुंभार यांनी अध्यक्ष स्थान भूषवले. या कार्यक्रमात मानव विकास योजने अंतर्गत 8 वी ते 10 वी च्या 4-5 किलो मिटर अंतरावरून वरुन येणाऱ्या विध्यार्थिनींना 11 सायकली वाटप करण्यात आल्या.या प्रसंगी प्रास्ताविक भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री. भीमराज डोळे सरांनी मानव विकास अंतर्गत प्राप्त सायकलीमुळे गरीब होतकरू मुलीना शिक्षणाची आवड निर्माण होईल व त्यांना शाळेत येण्यास अडथडा निर्माण न होता मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे सांगितले तर शाळेचे मा. चेअरमन श्री. कुंभार साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत झालेला बदल व त्यावरील उपाय यावर चर्चा केली. तसेच आपल्या भाषणातून मार्गदर्शन करीत सायकीलीचे विद्यार्थीजीवनात किती महत्व आहे व आपली शाळा शासनाच्या प्रत्येक लाभाचा फायदा घेऊन तो लाभ विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवतात असे त्यांनी सांगितले. तसेच मान्यवारांनी मनोगता मध्ये असे कार्यक्रम हे विद्यार्थी हिताचे असून अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.सदर कार्यक्रमासाठी पुढील मान्यवर उपस्थित होते. मा. सचिन टेके साहेब(फाऊंडर,एम इंडिकेटर), मा.धर्मेंद्र आंदेकर उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत परळी, आशिष सागळे, ऍड. सुशील गायकवाड(अध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना, सुधागड तालुका ), महेंद्र गायकवाड, सुनील वाघोस्कर, उदय धुमाळ, अमोल धुमाळ, रुपेश मांगळूरकर, संदीप वाघोस्कर, पिंट्या वाघोस्कर, तसेच शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. डोळे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका व सेवक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.संतोष भालेराव सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व सेवक वृंदानी मेहनत घेतली.
