आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
चिंचवली ( खोपोली) – सविस्तर बातमी अशी की, गेले अनेक दिवसापासून चिंचवली गावा नजीक मोठी वसाहत असलेले सरस्वती नगर हा परिसर आहे. आणि तिथेच नगर परिषदेची मराठी शाळा सुद्धा आहे. आणि याच परिसरात मुलांना खेळण्या साठी मैदान आहे. या जवळ च एक पर्यायी रस्ता आहे.परंतु गेले अनेक दिवसापासून या परिसरात चिखल आणि दगड हे रस्त्यावर असल्या मुळे या रस्त्यावर ये जा करणे कठीण हॊत होते, कारण रस्ताच मुळात राहिला नव्हता. परंतु या रस्त्यावर नजर ठेऊन असलेले चिंचवली गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच जेष्ठ समाज सेवक, श्री.नामदेव मोरे यांनी स्व खर्चाने स्वतः उभे राहून सरस्वती नगर. व मराठी शाळेजवळच्या मैदाना नजिक रस्त्यावर खडी टाकून रस्ता तयार करुन घेतला. त्यांचे हे कार्य बहुमोलाचे आहे. त्या मुळे सरस्वती नगरवासी त्यांना खुप खुप धन्यवाद देत त्यांना शुभेच्छा देत आहेत. गावकरी आणि परिसरातील लोक त्यांच्या या कार्याचे कौतुक करत आहे.
