आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
खोपोली – मे महिन्याचा पहिल्याच अवकाळी पावसाने चिंचवली शेडवली रस्त्याची दानादान उडाली आहे. या अवकाळी पावसाने चिंचवली शेडवली रस्ता कुठे आहे असे शोधता येत नाही एवढे प्रचंड खड्डे पडले आहे. सगळ्या रस्त्यावर डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या डबक्यातुन प्रवास करणे सर्व मोठ्या, शोटया वाहनचालकाला वं प्रवास्यांना त्रासदायक ठरू लागले असुन दररोज शोटे – मोठे अपघात घडू लागले आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडून काहींना इजा पोहचू शकते. हा रस्ता मुख्य रस्ता असुन नगरपालिकेचे या कडे दुर्लक्ष होत आहे. त्या मुळे अनेक जण संताप व्यक्त करत आहे. नगरपालिका प्रशासनाने या कडे त्वरित लक्ष देऊन गांभीर्याने खड्डे मुक्त रस्ता करावा, जेणेकरून सर्वांचा प्रवास सुखकारक होईल अशी भावना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रवींद्रजी मोरे यांनी व्यक्त केली आहे. सदर रस्ता लवकर करावा आणि पुढील होणारे नुकसान, अपघात टाळावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. वेळीच लक्ष नगरपालिकेने घातले नाही आणि काही अनुचित घटना घडली तर त्याला नगरपालिका प्रशासन जबाब दार राहील असे मत श्री. मोरे यांनी व्यक्त केले आहे.
