आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
केळवणे: कोकण एज्युकेशन संस्थेच्या केळवणे हायस्कूल येथे दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर जी. पाटील सर यांनी भूषविले. यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक एम. एस. पाटील सर, जेष्ठ शिक्षिका के. टी. ठाकूर मॅडम, पगारे सर, बी. के. ठाकूर मॅडम, कांबळे सर, गांगुर्डे सर, निखिल मांडवकर सर, आनंद मनवर सर शिक्षकेतर कर्मचारी श्री. संतोष पाटील सर, श्री. मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर 5 वी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आधारित विविध भाषणे व गीत सादरीकरण करून त्यांच्या विचारांचा जागर केला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षीय भाषणात श्री.आर. जी.पाटील सर यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमान, समान हक्क व आत्मनिर्भरतेची वाट कशी दाखवली,यावर सविस्तर मार्गदर्शन केले.आजच्या काळात केवळ जयंती साजरी न करता सावित्रीबाईंचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. एम. एस. पाटील सर, जेष्ठ शिक्षिका बी. के. ठाकूर मॅडम, कांबळे सर, पगारे सर, मनवर सर यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व पटवून दिले. तर गांगुर्डे सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासोबतच दिनदुबळ्या समाजाच्या उन्नतीसाठी व सामाजिक समानतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांबळे सर यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. निखिल मांडवकर सर यांनी प्रभावीपणे पार पाडले.कार्यक्रमाचे छायाचित्रण गांगुर्डे सर यांनी केले, तर आभार शाळेतील जेष्ठ शिक्षिका के. टी. ठाकूर मॅडम यांनी केले. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक समता व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांबाबत जागृती निर्माण झाली.






















