आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
परळी : को. ए. सो. डॉ. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी येथे देशभरात होत असलेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०७. ४५ वाजता ध्वजारोहन करण्यात आले व त्यानंतर सकाळी शासकीय परिपत्रका नुसार शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले गावंड विद्यालय आणि रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा परळी यांचा वतीने आज मिरवणूक व तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. यावेळी शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.डोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली श्री.भालेराव सर, श्री. अहिरे सर यांनी मुलांना कवायत,(पिटी) चे आयोजन केले. सर्व गावकरी, सर्व विध्यार्थी, मान्यवर, शिक्षक शिक्षिका सर्वांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला व रॅली मिरवणूक काढण्यात आली, विध्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसुन आला.शाळेचे चेअरमन मा. ऍड. प्रवीण भाई कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विध्यार्थी मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिनानिमित्त , उपस्थित होते.या वेळी गावातील नागरिक, शिक्षण प्रेमी, आणि सर्व युवा तरुण, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील कार्यकर्ते, केंद्रप्रमुख, उपस्थित होते. तिरंगा रॅली परळी कुंभार आळी मार्गे ग्रुप ग्रामपंचायत येथे जाऊन तेथील ध्वजरोहन कार्यक्रम संपल्यावर सांगता झाली. सर्व कार्यक्रमाचे संचलन, व सूत्रसंचालन श्री. संतोष भालेराव सर यांनी केले.
