आनंद मनवर
जिल्हाप्रतिनिधी रायगड.
उरण : डोंगरी येथील महिला सौ.इंदुमती नरेंद्र पाटील यांचा सर्प दंशानी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.त्या घराच्या अंगणात साफसफाई चे काम करत असताना कोकणात आढळणारा अतिविषारी मन्यार जातीच्या सापाने त्यांना दंश केला.तेव्हा त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. डोंगरी गावात अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावा साठी त्या परिचित होत्या.त्यांच्या या कमिवयात अचानक जाण्या मुळे सर्वत्र हळहळ होत आहे. त्यांचा अंतिम संस्कार डोंगरी गावच्या स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुळ वातावरणात करण्यात आला. या वेळी माझी आमदार श्री. मनोहर शेठ भोईर यांच्या सह अनेक कार्यकर्ते, पुढारी, मान्यवर, आप्तेष्ठ गणगोत मोठ्या संख्येने उपस्थित होते.























