आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी, रायगड
केळवणे (दि. १३ फेब्रुवारी) : येथील को. ए. सो. हायस्कूल, केळवणे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शाळेचे चेअरमन मा. कोळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याध्यापक श्री. आर. जी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणात मा. कोळी साहेब यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळा समिती सदस्य मा. डॉ. शिवकर साहेब यांनी दहावीनंतर व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्व पटवून देत व्यावसायिक शिक्षण घेण्याचा सल्ला दिला तसेच वैद्यकीय क्षेत्र निवडण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन केले. शाळा समिती सदस्य मा. ठाकूर सर व मा. आशिष घरत सर यांनी मेहनत व चिकाटीच्या जोरावर ध्येय साध्य करण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. आर. जी. पाटील सर यांनी यशस्वीतेचा मंत्र देत परीक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. जेष्ठ शिक्षिका सौ. के. टी. मॅडम यांनी दहावीच्या परीक्षेचे नियम तसेच शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाबाबत माहिती दिली. जेष्ठ शिक्षक श्री. एम. एस. पाटील सर, श्री. पगारे सर, सौ. भूमिका ठाकूर मॅडम, श्री. नवनीत कांबळे सर, श्री. देविदास गांगुर्डे सर व श्री. निखिल मांडवकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षकांविषयी व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नवनीत कांबळे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. निखिल मांडवकर सर यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील कर्मचारी मा. संतोषजी पाटील सर तसेच श्री. मधुकर पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.























