आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी, रायगड
केळवणे : आषाढी एकादशीनिमित्त को. ए. सो. हायस्कूल, केळवणे येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. भूमिका ठाकूर यांनी विद्यार्थिनींचे लेझीम पथक तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर आकर्षक सादरीकरण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणासह अभंग गात विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.गावातून दिंडीचे आगमन होताच ग्रामस्थांनी भक्तिभावाने दिंडीचे स्वागत व पूजन केले. शिक्षक श्री. पगारे यांनी विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध व्यवस्था सांभाळत दिंडीचे नियोजन यशस्वीपणे केले.दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री. गौतम कांबळे, ज्येष्ठ शिक्षक एम. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका के. टी. ठाकूर, सौ. भूमिका ठाकूर,श्री. अनमोल पगारे श्री. नवनीत कांबळे, श्री. देविदास गांगुर्डे, श्री. निखिल मांडवकर, श्री. आनंद मनवर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. मधुकर पाटील आणि श्री. संतोष पाटील उपस्थित होते.यानंतर दिंडी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नेण्यात आली. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. अभंग, भजन आणि नामस्मरणात विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निखिल मांडवकर यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजविण्यासह आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश प्रभावीपणे पोहोचला.






















