आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
परळी :- आज दिनांक 10/07/2025 रोजी दइसरिया फॉउंडेशन मुंबई यांच्या मार्फत फॉउंडेशन मुख्य सदस्या श्रीमती हर्षा दइसरिया व सदस्य रोहन दइसरिया फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने राजिप केंद्रशाळा परळी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 🛍️ व वृक्षारोपण केले.🌱🌱 जिल्हा परिषद केंद्र शाळा परळी येथे हर्षा जतीन दईसरिया व रोहन जतीन दईसरिया फाउंडेशन यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य व वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परळी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती साक्षीताई सतीश देसाई तसेच सदस्या, श्रीमती सविताताई सतीश पवार व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख श्री. घनश्याम हाके, परळी हायस्कूलचे अहिरे सर,आनंद मनवर सर , श्री. सुरवसे सर उपस्थित होते. या फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य,छत्री,स्कूल बॅग्स,कलर्स,स्केच पेन,पाणी बॉटल. असे अनेक साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी फाउंडेशन मार्फत हर्षा जतीन दईसरिया व रोहन जतीन दईसरिया जयंत भाई सांगवी,प्राची जाधव, विनिता सोलगम, राघवेंद्र सर इत्यादी अनेक सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप खूप मेहनत घेतली. शैक्षणिक साहित्य सर्व मान्यवर यांच्या मार्फत वाटप करण्यात आले. त्या वेळी शाळे साठी मैदान, बाग, तसेच विविध साहित्य उपलब्ध करुन शाळेला मोठी आर्थिक मदत करुन शाळा व शालेय परिसर सुसज्ज करण्याचे आश्वासन फॉउंडेशन च्या सर्व सदस्यांनी सांगितले. भविष्यात मुलांना सगळ्या सुख सुविधा परवू असे ठोस पणे सर्वांनी आप आपल्या भाषनात मनोगत व्यक्त करताना सांगितले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री भुसे सर श्री शेख सर व श्रीमती शिंदे मॅडम यांच्यामार्फत उपस्थित सर्व मान्यवर यांचे आभार मानले.
