आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
सुधागड:- तालुक्यामधील छोटेसे खेडेगाव या खेडेगावांमध्ये अनेक विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे असून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सौ ज्योती संतोष तुरे यांच्या सामाजिक सहभागातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सौ ज्योती तुरे यांची समाजाशी असणारी बांधिलकी व शिक्षणासंदर्भात असणारे त्यांचे विचार या विचारातूनच अनेक दानशूर व्यक्तीने या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे मदत केली. शाळा स्तरावर निरनिराळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सौ.ज्योती तुरे यांचं समाजातील विविध माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे.
तसेच शाळेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या उपक्रमांतर्गत शाळा व परिसर स्तरावर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. प्रत्येक झाड जगलं पाहिजे व त्याची चांगल्या रीतीने निगा घेणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून प्रत्येक बालकाला व त्याच्या पालकाला झाडाची निगा राखण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शन शाळेच्या शिक्षिका ज्योती संतोष तुरे यांनी अतिशय उत्तम प्रकारे दिले. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. भविष्यामध्ये हे झाड आपल्याला खूप काही देऊन जातील याच्यासाठी प्रत्येकाने निदान दरवर्षी एक तरी झाड लावणं गरजेचं आहे. असे आवाहन ज्योती तुरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. तसेच एक पेड मा के नाम या उपक्रमातून जाणीव जागृती निर्माण केली. या प्रसंगी शाळेतील उपशिक्षक श्री रोशन रमेश तांडेल सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी मदत केली
