आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
रायगड :-महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतरना अनुदान मिळवून देण्यासाठी जीवाची पराकाष्टा केली. म्हणून जालना आणि मराठवाडा विभागातील शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर व मराठवाडा मतदार संघाचे आमदार श्री विक्रमजी काळे साहेब यांचा भव्य सत्कार जालना या ठिकाणी आयोजित केला होता. टप्पा वाढ अनुदानाबरोबर, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना न्याय मिळवून देणे, शेवटच्या वर्गाच्या पडसंख्येसाठी शाळांना पात्र करून अनुदान मिळवून देणे, पदांची दुरुस्ती, टप्पा वरचे रोखलेले आदेश पुन्हा मिळवून देणे, भविष्यात एनपीएस योजना सुरू करता येईल का याविषयी प्रयत्न करणे, टीईटीतून शिक्षकांना मुक्तता करून देणे, अशैक्षणिक कामातून मुक्तता, अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन थांबले आहे, त्यासाठी पदसंख्येचे निकष शितल करून घेणे, जुनी पेन्शन लागू करणे, अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करणे, आश्वासित प्रगत योजना लागू होणे इत्यादी कामासाठी प्रयत्न करत असल्याचे दोन्ही आमदाराने सांगितले. या वेळी
जालना विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री अर्जुन खोतकर साहेब यांच्या हस्ते दोन्ही आमदारांचा सत्कार करण्यात आला, या सत्कार समारोपप्रसंगी माजी मंत्री श्री टोपे साहेब यांनी भेट दिली, तसेच मंचावर भाऊसाहेब घुगे, बायस सर, शिवराम मस्के, उद्धव मस्के, मोंटे सर जगत घुगे सर बाळासाहेब अंबुज ,खैरे सर रवींद्र चव्हाण, रामदास कुलकर्णी,रमेश शेळके नागरे सर दत्तात्रय चव्हाण, रविकांत जोजारे ज्ञानेश्वर वायाळ,नागळवाड सर होम एखंडे, गणेश सुरासे, मगर सर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक श्री विजय सुरासे, ज्ञानेश चव्हाण, शंकर शेरे, दीपक कुलकर्णी, भारत जामनिक, जगदीश भगस, ओम एखांडे, आणि अनेक मान्यवर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.





















