आनंद मनवर
जिल्हाप्रतिनिधी रायगड.
केळवणे: नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत येथील को. ए. सो. केळवणे हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे. कु.आर्य कांचन घरत व कु. अंशिका निवास पाटील या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या असून त्यांना दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे एकूण 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशाबद्दल शाळेत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा समितीचे चेअरमन मा.श्री.कोळी साहेब, शाळा समिती सदस्य मा.डॉ. शिवकर साहेब, मा.विलास ठाकूर साहेब, मा.आशिष घरत साहेब. यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक श्री.रामचंद्र गणा पाटील यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे नवनित कांबळे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिक्षक एम.एस.पाटील सर , के.टी.ठाकूर मॅडम अनमोल पगारे सर , भूमिका ठाकूर मॅडम देविदास गांगुर्डे सर निखिल मांडवकर सर, आनंद मनवर सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री.संतोष पाटील, श्री. मधुकर पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशाबद्दल विद्यार्थिनींचे केळवणे गावासह परिसरातून कौतुक होत आहे.























