आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
केळवणे : उरण तालुक्यातील कोप्रोली, पुनाडे येथील डोंगर परिसरातील आदिवासी नागरी वस्ती मध्ये मंगळवारी दि. 09/12 रोजी रात्रीच्या अंधारात बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बिबट्याने दोन बकऱ्या आणि दोन कुत्रे फस्त केल्याची धक्का दायक माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना कमालीची भीती वाटत असुन, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक नागरिक गेल्या आठ तासापासून अथक प्रयत्न करत होते. म्हात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही त्या मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन बिबट्या आला रे आला अशी घोषणा देत उरण करांनो सावधान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन, रात्रीच्या सुमारास पुनाडे, कोप्रोली परिसरात वस्थित बिबट्या शिरल्याची बातमी पसरताच नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली अनेक लोक आपली दारे खिडक्या बंद करुन घरात राहणे सुरक्षित मानले.






















