आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
माणगाव – उन्हाळी सुट्टी निमित्त कुटुंब गावी आले असताना हा दुःखद प्रसंग घडला मुंबईतील विलेपार्ले येथे राहत असलेले उतेकर कुटुंब आपल्या माणगाव मधील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोसेवाडी या आपल्या गावी आले होते.याचं कुटुंबातील निधी राकेश उतेकर वय वर्ष 15 आपल्या वडिलांचा मोबाईल घेउन रात्रीं सुमारे नऊ साडेनऊ च्या सुमारास बोलत घरा बाहेर पडली.बराच वेळ झाला मुलगी घरात आलीच नाही. तेव्हा त्याच रात्रीं कुटुंबातील लोकांनी तिचा शोध सुरु केला. परंतु तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्याच परिसरातील जंगलात बुधवार दिनांक 27 मे ला एका मुलीचा मृत्यूदेह असल्याची खबर पोलिसांना लागली.तेव्हा पोलिसांनी मुलीच्या पालकांना घेउन घटना स्थळ दाखवले असता तो मृत्यूदेह निधीचाच असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या अंगावर असलेल्या जखमा बघुन तिचा खुन अतिशय निर्दयतेने केला असे दिसून आले. निधी ही इयत्ता 9 वीला विलेपार्ले येथे सेंट जेव्हीयर्स या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकत होती. गेल्या आठवड्यातच ती आपल्या आई, वडील भावा सोबत उन्हाळी सुट्टीत गावी आले होते. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटना स्थळी आपल्या फौंज फाट्यासह घटना स्थळी आले.या घटनेचा छळा लावण्या साठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकांना पाचरण करण्यात आले. निधीचा मृत्यूदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करीता पाठवण्यात आले. तो रिपोर्ट आल्यावर घटनेचा शडा उलघडण्यास मदत होईल.नेमके कारणही कळेल या घटनेचा माणगाव पोलीस यंत्रणा अधिक सतर्क होऊन होऊन पोलीस कसून तपास करत आहे.

















