आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड – केळवणे को. ए. सो.हायस्कूल द्वारे दिनांक 19 फेब्रुवारी, 2026, रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. आर. जी. पाटील. सर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून शाळा समिती चेअरमन, श्री. कोळी साहेब, शाळा समिती सदस्य आदरणीय श्री.डॉ. शिवकर साहेब, शाळा समिती सदस्य आदरणीय श्री.आशिष घरत साहेब, तसेच शाळा समिती सदस्य आदरणीय ठाकूर साहेब उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्यची संकल्पना आणि त्यांच्या आदर्शांच्या आजच्या पिढीने अंगिकार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात विशेष म्हणजे शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. अनमोल पगारे सर,यांनी अथक प्रयत्न करुन मुलींचे लेझीम पथक तयार केले. यांच्याद्वारे शिवगर्जना देत शाळेचे वातावरण शिवमय केले. या वेळी शाळेत विदयार्थ्यांनी, महाराज्यांच्या जीवन चरित्र्यावर भाषणे केली. तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. एम एस पाटील सर, जेष्ठ शिक्षिका के. टी. ठाकूर मॅडम, सौ. भूमिका ठाकूर मॅडम, श्री. नवनीत कांबळे सर, श्री. निखिल मांडवकर सर,श्री. देविदास गांगुर्डे सर यांनी सुद्धा भाषणे केली. आणि शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य आणि जीवन चरित्र्याची माहिती विध्यार्थ्यांना खोल पर्यंत करुन दिली. आदर्श राजा कसा असावा याचा परिचय करुन दिला. या वेळी श्री. अनमोल पगारे सर व सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेपासून गावातील बसस्टॅण्ड जवळ रॅली काढून मुलींनी शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम पथकाचे सादरीकरण करण्यात आले .दरम्यान ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि इतर देशभक्तीपर घोषणाबाजी करून परिसरात जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नवनीत कांबळे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण श्री. देविदास गांगुर्डे सर यांनी केले.आणि आभार प्रदर्शन श्री. निखिल मांडवकर सर यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचारी, श्री संतोष पाटील सर, श्री मधुकर पाटील आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.






















