आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड.
पनवेल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न यांची १३५ वी जयंती जिंदाल परिवारातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
१३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजता प्रतिमा पूजन व आतिषबाजीने जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सकाळी अल्पोपहारानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोसायटी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली.
सकाळी प्रतिमा पूजन, बुद्धवंदना व अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे कुमार मेटांगे यांनी सध्याची सामाजिक परिस्थिती आणि महापुरुषांचे विचार या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाला आजही मोठा आधार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित होते. यावेळी सोसायटीतील सदस्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यानंतर लहान मुलांसाठी नृत्य, वक्तृत्व, चित्रकला व इतर सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले. सायंकाळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.























