आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी, रायगड.
परळी: रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा परळी येथे शाळेचे माजी विद्यार्थी व परळी गावचे सुपुत्र श्री. प्रशांत हरिश्चंद्र कुंभार (प्रशांतदादा कुंभार) यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमास शाळेतील केंद्रप्रमुख श्री.हाके सर,मुख्याध्यापक श्री.शहानवाज शेख सर , शिक्षिका शिंदे मॅडम, करले मॅडम तसेच माध्यमिक शिक्षिका बोरिटकर मॅडम, घुटे मॅडम, शिपाई श्री. राम बोरिटकर तसेच विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने श्री. प्रशांतदादा कुंभार यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.























